पशुसंवर्धन विभागातर्फे राबविण्यात येणार्या योजनेंतर्गत अनुदानावार दुधाळ जनावरे वाटप करण्यात येणार आहे. त्याकरिता जिल्हा पशुसंवर्धन विभागातर्फे ई-अर्ज प्रणालिद्वारे अर्ज मागविण्यात आले आहेत
लाभार्थी निवड प्रक्रिया रॅंडम पद्धतिने करण्यात येणार असल्याने ई-अर्ज प्रणालिद्वारे माहिती भरतांना दस्तावेज जोडण्याची आवश्यकता नाही.
५० % अनुदानावर दुधाळ जनावरे गट किंवा शेळी / मेंढी गट किंवा १००० पक्षी मासल गृह
पात्रता :
अर्जदाराराने किंवा त्याच्या कुटुंबातिल व्यक्तिने योजनेचा यापुर्वी लाभ घेतलेला नसावा.
०१ मे २००१ नंतर तिसरे अपत्य नसावे
पात्र व प्रतिक्षाधिन अर्जदारांचे ई-प्रणालिद्वारे कागदपत्रे सादर करण्याचा कालावधी : ०६/१२/२०१८ ते ०९/१२/२०१८
अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे –
१) * फोटो ओळखपत्राची सत्यप्रत (अनिवार्य )
२) * सातबारा व ८ अ उतारा आणि ग्रामपंचायत नमुना नंबर ८ (अनिवार्य )
३) * अपत्य दाखला (ग्रामपंचायतचा ) (अनिवार्य )
४) * आधारकार्ड (अनिवार्य )
५) * रहिवासी प्रमाणपत्र (अनिवार्य )
६) * बँक खाते पासबुक सत्यपत्र (अनिवार्य )
७) * रेशनकार्ड / कुटुंब प्रमाणपत्र (एकाच कुटूंबातील एकच व्यक्तीला लाभ घेता येईल .) (अनिवार्य )
८)अनुसूचीत जाती असल्यास जातीच्या दाखल्याची सत्यप्रत
९) बचत गट सदस्य असल्यास त्याचे प्रमाणपत्र
१०) वय – जन्मतारखेचा पुरावा सत्यप्रत
११) शैक्षणिक पात्रतेचा दाखला.
१2) रोजगार ,स्वयंरोजगार कार्यालयाचे नाव नोंदणीकार्डची सत्यप्रत
१3) अपंग असल्यास दाखला
१४) प्रशिक्षण घेतले असल्यास प्रमाणपत्राची छायांकित प्रत